गुजरात निवडणुकीसाठीचा प्रचार आता संपला आहे. या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान काँग्रेस-भाजप कडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. काही वेळा तर खालच्या पातळीला जाऊनही टीका करण्यात आली. पण प्रचाराच्या शेवटी मात्र काँग्रेस नेते अल्पेश ठाकोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हास्यास्पद आरोप केले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आधी माझ्यासारखेच कृष्णवर्णीय होते, पण आयात केलेले मशरूम खाल्ल्यामुळे मोदी आता गोरे झाले आहेत, असा दावा अल्पेश ठाकोर यांनी केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी खात असलेले हे मशरूम तायवानहून येतात. मोदी दिवसाला पाच मशरूम खातात. या एका मशरूमची किंमत 80 हजार रुपये आहे,असे ते दिवसाला ४ लाख रुपये फक्त मशरूम वर खर्च करतात असं हास्यास्पद वक्तव्य अल्पेश ठाकोर यांनी केलं आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews